सोलापूर – सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना अधिक वाढल्या होत्या. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसही चिंतेत होते. काही लोकांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी (Solapur Police) चौकशी सुरु केली. त्यानंतर 2017 पासून आजपर्यंत 13 ट्रॅक्टर चोरणारी टोळी (Tractor stealing gang) उघडकीस आली. पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी चांगली कामगिरी केल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडं कौतुक होत आहे. 1 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तिघांकडून हस्तगत केला आहे. उर्वरीत दोघे सापडल्यानंतर त्यांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून 13 ट्रॅक्टर्स, 13 हेड्स,9 ट्रॉली आणि 1 ब्लोअर असा एकूण 1 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चमकदार कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांची चर्चा आहे. या प्रकरणाचा छडा मोहोळ पोलिसांनी लावला आहे अशी माहिती सोलापूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी दिली.
मागच्या कित्येक दिवसांपासून गाड्या चोरणारे पोलिसांच्या रडारवर होते. पोलिसांनी अनेक ठिकाणी त्यासाठी पाळत सुध्दा ठेवली होती. फरार दोघेजण ताब्यात आल्यानंतर काही गोष्टीचा छडा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.