Facebook फ्रेन्डसोबत चॅटिंग, चॅटिंगमधून प्रेम, प्रेमातून लग्न! पण लग्नानंतर अजब प्रकार उघडकीस

| Updated on: Oct 21, 2022 | 9:11 AM

एका विशिष्ट समुदायाच्या मुलानं हिंदू मुलीसोबत जे केलं, ते निव्वळ संतापजनक!

Facebook फ्रेन्डसोबत चॅटिंग, चॅटिंगमधून प्रेम, प्रेमातून लग्न! पण लग्नानंतर अजब प्रकार उघडकीस
लग्नात नवऱ्याला यायला उशीर झाला
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

फेसबुकवर (Facebook) मैत्री, मैत्रीतून चॅटिंग, चॅटिंगमधून प्रेम आणि प्रेमातून लग्न असा सामान्य घटनाक्रम एका हिंदू मुलीच्या (Hindu Girl) बाबतीत घडला. पण लग्नानंतर या मुलीसोबत खळबळजनक घटना घडली. लग्नानंतर गरोदर राहिलेल्या या हिंदू मुलीला एका विशिष्ट समुदायातील असलेल्या मुलानं वाऱ्यावर सोडून दिलं. त्यानंतर या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. हा धक्कादायक प्रकार बिहारमधील आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये लव जिहादसारखा (Love Jihad) खळबळजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

धक्कादायक बाब म्हणजे आता या मुलीकडे तिच्या माहेरच्या लोकांनाही पाठ फिरवली आहे. त्यांनीही मुलीला मदत करण्यास नकार दिलाय. तुझ्या मर्जीने लग्न केलंस ना, आता तू त्याचे परिणाण भोग, असं म्हणत मुलीच्या माहेरकडच्यांनीही हात वर केलेत.

गरोदर तरुणी दोन महिन्यंपासून पोलीस स्थानकात ये-जा करतोय. पण ना कोणतीही तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आणि नाही कोणती कारवाई केली. ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी ही पीडिता एसपी योगेंद्र कुमार यांच्या जनता दरबारात पोहोचली. त्यावेळी एसपी कुमार यांनी पीडित मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

समस्तीपूर जिल्ह्यात राहणारी चांदनी कुमारी बेगूसराय मधील एका मॉलमध्ये काम करते. जानेवारी 2020 मध्ये फेसबुकवर मैत्री करुन मोहम्मद आफताब आलम याने तिच्यासोबत संबंध ठेवले. अनेकदा तिचा गर्भपात करण्यास भाग पाडलं.

लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर मोहम्मदने चांदनीसोबत काली मंदिरात अखेर लग्न केलं. दोघं नवरा-बायको सारखे राहू लागले. अधेमधे मोहम्मद आपल्या गावी राहायला जायचा. जेव्हा चांदनीने तिला सासरी घेऊन जाण्याची विनंती केली, तेव्हापासून मोहम्मद फरार असल्याचं चौकशीतून समोर आलंय.

चांदनी दोन महिन्याची गरोदर आहे. गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप तिने मोहम्मदच्या कुटुंबीयांवर केलाय. याप्रकरणी ती पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेली. बेगूसराय इथं तक्रारीसाठी गेल्यानंतर तिला समस्तीपूर इथं पाठवण्यात आलं. आधीच खचलेल्या चांदनीला पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्यानं ती अधिकच निराश झाली.

आता बेगूसरायचे एसपी योगेंद्र कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. महिला पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जातोय. याप्रकरणातील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलंय.