उत्तर प्रदेश : किरकोळ वादातून माथेफिरु पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला (Husband Attack on Wife) करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी (Uttar Pradesh, Barabanki) जिल्ह्यात घडली आहे. शेजाऱ्यांना या प्रकरणाची चाहूल लागताच त्यांनी तात्काळ आरोपीच्या घराकडे धाव घेत त्याला पकडले. आरोपीला बेदम मारहाण (Beating) करत पोलिसांच्या हवाली केले. अजय कुमार असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील सतरिख पोलीस ठाण्याअंतर्गत जैनाबाद मजरे बबुरिहा गावात ही थरारक घटना घडली आहे. अजय कुमारचा 15 वर्षांपूर्वी सिकदंरपूरमधील वर्षा हिच्याशी झाला होता.
अजय हा नेहमी पत्नी वर्षाला त्रास द्यायचा. छोट्या छोट्या कारणावरुन पत्नीला मारहाण करायचा. वर्षा वारंवार याबाबत आपल्या माहेरच्यांकडे तक्रार करत होती. मात्र कुटुंबीय तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवायचे, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा घरी खाटेवर झोपली होती. यावेळी नेहमीप्रमाणे अजय आणि तिच्यामध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अजयने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वर्षाचा जागीच मृत्यू झाला. इतका खुन्नसमध्ये होता की, महिलेच्या मृत्यूनंतरही पती वार करतच होता.
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीकडून पत्नीच्या हत्येत वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.