पुणे : अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम वकील करतात. मात्र एका वकिलानेच त्याच्या सहकारी ज्युनिअर वकील महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात(Pune) घडली आहे. वकिलाने गाणं गुणगुणत डायरेक्ट किस मागत विनयभंग(lawyer molested) केल्याची तक्रार एका ज्युनिअर वकील महिलेने(junior lawyer woman) केली आहे. या घटनेमुळे महिला वकिलांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्ररकरणी तक्रार दाखल झाली आहे.
ज्युनिअर वकिल महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका 40 वर्षीय वकीलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधून येताना गाणे गुणगुणत किसची मागणी केली, असे पिडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
ऍड. धर्मराज जाधव (४०) यांच्यावर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 37 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 6 ते 27 जुलै या कालावधीत घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित या देखील वकिल आहेत. त्या जाधव यांच्याकडे ज्युनिअर वकिल म्हणून काम करत होत्या. यादरम्यान कामानिमित्त कारमधून एकत्र प्रवास करताना जाधव यांनी एक जुने गाणे म्हणत त्यांच्याकडे किस मागितल्याचा आरोप या ज्युनिअर वकिल महिलेने केला आहे. तसेच न्यायालयात देखील त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. इतकंच नाही तर याला विरोध केला असता त्यांना व त्याच्या पतीला शिवीगाळ केल्याचेही या ज्युनिअर वकिल महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
संशयाचा अंगात शिरलं की माणूस कोणत्या स्टेपला जातो याचा प्रत्यय (Ghaziabad) गाझियाबादमधील लोणी येथे आला आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याच घटना होत राहिल्यास संशय अधिकच बळावतो आणि माणूस मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाची भूमिका घेतो. भाऊ वारल्यानंतरही वहिनी रात्री अज्ञात व्यक्तीशी बोलत असल्याचा संशय घेत दीराने विधवा वहिनीच्या डोक्यात हातोडीने वार करुन तिची (Murder) हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय आपणच हे कृत्य केल्याची कबुलीही मृताच्या दीराने पोलीसांना दिली आहे. वहिनीने फोन बोलल्याले घरातीलच कुणालाच आवडत नव्हते. असे असतानाही दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढल्याने दीराने हे कृत्य केले आहे. सदरील महिलेला तीन मुले असून 11 महिन्यांपूर्वीच रस्ते अपघातामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला होता.