मालेगाव, नाशिक : मालेगावमध्ये (Malegaon) सध्या पुरुषाची मोठी चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे . हा काही कुणी गब्बर वगैरे नाहीये. पण त्याची तितकीच भीती नागरिकांमध्ये (Citizen) आहे. तो मध्यरात्री सुनसान रस्त्यावर बिनधास्तपणे फिरत आहे. त्याला कसलीही भीती वाटत नसली तरी त्याची भीती सर्वच नागरिकांना आहे. हे काही दिवस किंवा महिन्यांपासून नाही घडत, तब्बल दोन वर्षापासून तो शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात मध्यरात्री नागरिकांना दिसत आहे. विशेष म्हणजे तो फिरत असतांना त्याची वेशभूषा ही स्रीची असते. आणि चेहरा संपूर्ण रुमालाने बांधलेला असतो. भूतासारखीच वेशभूषा असल्याने नागरिकांना दिसताच क्षणी त्याची धडकी भरते.
मालेगाव जवळील सोयगाव आणि परिसरात त्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलांना अनेकदा त्याचे दर्शन झाले आहे.
स्री वेशात असलेला पुरुष मनोविकृत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अशा वागण्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
परिसरातील इंदिरानगर, पारिजात कॉलनी, डि. के. चौक, विठ्ठलनगर, आणि जिभाऊनगर या परिसरात हा व्यक्ति महिलांनाच त्रास देत आहे.
मनोविकृत असलेला हा पुरुष महिलांचे कपडे आणि चेहऱ्याला कपडा बांधत असल्याने चित्रपटात असलेल्या भूतासारखाच दिसतो आहे.
हा मनोविकृत पुरुष लहान मुलांचे आवाज काढून भीती देखील निर्माण करत आहे. त्यामुळे मध्यरात्री किंवा पहाटे घराच्या बाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीये.
महिलांचे साडी, ब्लाउज, अंतर्वस्त्रे चोरण्याची त्याला सवय असल्याची माहिती समोर येत आहे. महिलांच तो लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
इंदिरानगर परिसरातील रुचिका जनरल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचा वावर कैद झाला असून त्याचा पोलीसांनी शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.
याबाबत त्याचा चेहरा किंवा देहबोली स्पष्ट होत नसल्याने व्यक्ति कोण आहे ? याबाबत ओळख पटत नाहीये.