थायलंड : थायलंडमध्ये(Thailand) एक थराराक आणि भयानक घटना घडली आहे. एका माथेफिरुने एक दोन नाही तर तब्बल 34 जणांना गोळ्या घालून ठार केले आहे. आरोपीने हे कृत्य का केले यामागचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले आहेत. आरोपीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक जण जखमी देखील झाले आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आरोपी हा माजी पोलिस अधिकारी असल्याचे समजते. आरोपीने थायलंडमधील डे केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्युमुखी पडलेल्या 34 जणांमध्ये 23 मुले आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. आरोपी जेव्हा डे केअर सेंटर मध्ये घुसला तेव्हा मुलं झोपली होती. त्याने अचानक बंदूक काढली आणि अंधाधुंद फायरींग सुरु केली. यामुळे एकच खळबळ उडाली.
डे केअर सेंटरमध्ये गोळीबार केल्यानंतर आरोपीने घरी जाऊन पत्नी आणि मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
आरोपीचे नाव पन्या खमराब असून तो साधारण 34 वर्षांचा होता. तो थायलंडच्या पोलिस खात्यात अधिकारी पदावर कार्यरत होता.
त्याला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले होते. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. प्रचंड मानसिक तणावामुळे त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.