मध्यप्रदेश : भंवरकुआं पोलिसांनी (MP police) दिल्लीतून (Delhi) एका अशा आरोपीला अटक केली आहे. तो सोशल मीडियावर (social media) महिलांशी दोस्ती करायचा आणि लग्न करतो असं आश्वासन द्यायचा. त्याने आतापर्यंत अनेक महिलांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर लाखो रुपयांना गंडा घातला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस त्या आरोपीची कसून चौकशी करीत आहे. चौकशीत त्याने खूप महिलांची फसवणूक केल्याची कबूली दिली आहे. नवे खुलासे उजेडात येत असल्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
भंवरकुआं पोलिस स्टेशनचे चौकशी अधिकारी आनंद रॉय यांनी सांगितलं की, केरळ राज्यातील रहिवाशी श्रीनिवास राव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रार याच्यासाठी दिली होती की, त्यांच्या पत्नी बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली की, महिलेच्या खात्यातून दिल्लीला पैसे पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर मोबाईल लोकेशन पोलिसांनी शोधायला सुरुवात केली. बेपत्ता झालेल्या महिलेचं बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव मोहसिन आहे. त्यानंतर पोलिसांनी मोहसिन चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
ज्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली, त्यावेळी तो बंगालमध्ये असल्याचं आढळून आलं. चौकशीत त्याच्याकडे अनेक महिलांचे मोबाईल नंबर सापडले. काही महिलांनी त्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. महिलांशी गोड बोलून तो लाखो रुपयांना गंडा घालायचा. आरोपी दिल्लीतील एका महिलेला भेटला सुध्दा आहे. सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरु असून मोहसिन सगळा कारनामा उजेडात येत आहे. तो प्रत्येकवेळी सोशल मीडियावर आपलं नाव बदलून दोस्ती करीत आहे.