मुंबई / गोविंद ठाकूर : मालाडमधील कुरार आनंदनगर आप्पा पाडा परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. आगीत कुणीही जखमी झाल्याची किंवा अडकल्याची अद्याप माहिती मिळाली नाही. आगीचे लोळ परिसरात पसरले होते. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते.
सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, 100 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. अथक प्रयत्नांतर आग विझवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आले आहे. परिसरात कुलिंगचे काम सुरु आहे. सिलेंडरला आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही.
एका घरात आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. झोपडपट्टी परिसर असल्याने आग लगेच पसरली आणि आगीत आजूबाजूच्या घरातील सिलेंडरचाही स्फोट झाला. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिक तात्काळ घराबाहेर पळाले आणि खुल्या मैदानात आले. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत तपास सुरु आहे. तपासाअंती आगीचे कारण स्पष्ट होईल. आगीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेकडून एका शाळेत व्यवस्था एका शाळेत करण्यात येत आहे.