बुलढाणा : ही घटना आहे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात नायगाव येथील. वेदांत सपकाळ नामक युवकाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेले. याची तक्रार नांदुरा पोलिसात काही दिवसांपूर्वी झाली होती. सदर तक्रारीवरून आरोपी वेदांत सपकाळ विरोधात नांदुरा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपीच्या शोधात होते. काल सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नायगाव फाट्यानजीक असलेल्या बायोडिझेलच्या (Biodiesel) टाकीत वेदांत सपकाळ याचा मृतदेह आढळला. त्यामुळे आता वेदांत सपकाळ याचा घातपात झाला की काय ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
बायोडिझेलच्या टाकीमध्ये या युवकाचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केली, की त्याची हत्या करण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वेदांत सपकाळचं एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं. अशी तक्रार वेदांत विरोधात करण्यात आली. यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. नांदुरा पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. अशात तो मृतावस्थेत सापडला. नायगाव फाट्याजवळ बायोडिझेलची टाकी आहे. त्या टाकीत त्याचा मृतदेह सापडला.
वेदांतचा मृतदेह सापडल्याने त्याला कुणी मारून तर फेकलं नाही ना, अशी शंका येते. शिवाय वेदांतने या सर्व घडामोडींमुळे स्वतःला संपवलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यापैकी कोणती बाजू खरी आहे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल. शवविच्छेदनानंतर वेदांतचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा अहवाल येईल. त्यानंतर पोलीस योग्य दिशेने तपास करतील. तोपर्यंत वेदांतचा मृत्यू नेमका कसा झाला याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
वेदांतचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबीय विचारात पडले आहेत. वेदांतनं आत्महत्या केली की, त्याला कुणीतरी मारून तिथं फेकून दिलं, अशी शंका व्यक्त केली जात आहे. नांदोरा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. बायोडिझलच्या टाकीमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.