Dombivali Crime : इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, मित्राने भेटायला बोलावले मग…

| Updated on: Jul 28, 2023 | 9:27 AM

सोशल मीडियावरील एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली आहे. मित्राने मुलीला भेटायला बोलावले अन् नको ते कृत्य केले.

Dombivali Crime : इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, मित्राने भेटायला बोलावले मग...
इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली / 28 जुलै 2023 : सध्या सोशल मीडियाचे प्रचंड फॅड अल्पवयीन मुलं, तरुणांमध्ये आहे. याच सोशल मीडियामुळे अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. सोशल मीडियावर मैत्री करत मुलींना भेटायला बोलावून त्यांच्यासोबत घडणाऱ्या अनुचित घटनांमध्येही वाढ झाली आहे. अशीच एक घटना डोंबिवलीत पुन्हा उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री करणे एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे. मित्राने भेटायला बोलावून मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. काशिनाथ पाटील असे अटक आरोपीचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली

पीडित 14 वर्षाच्या मुलीची इन्स्टाग्रामवर आरोपीशी मैत्री झाली. यानंतर आरोपीने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत तिला भेटायला बोलावले. दुसरीकडे मुलगी घराबाहेर गेली ती पुन्हा परतलीच नाही. यामुळे तिच्या घरच्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. पोलिसांनी मुलीच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्यांना मुलीच्या इन्स्टाग्रामवरील मित्राबद्दल कळले. यानंतर पोलिसांनी सायबर पोलीस आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने मुलीचा शोध घेतला.

आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई

मुलीला ताब्यात घेत तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीविरोधात भादवि कलम 376 सह पोस्को कलम 4,6, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी एम.पी. मुंजाळ यांच्या पथकाने कारवाई केली.

हे सुद्धा वाचा