नाशिक : दिल्ली येथील श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण असतांना नाशिकमध्ये एका संतापजनक घटना समोर आली आहे. आधार आश्रम चालवणाऱ्या संचालकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पॉस्को कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने ही घटना वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मिडियावरून नागरिक संताप व्यक्त करत आहे. नुकतेच नाशिकमधील अंजनेरी येथील आधारतीर्थ येथील चार वर्षीय बालकाच्या खुनाची घटना ताजी असतांना माने नगर येथील आधार आश्रमात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. द किंग फाउंडेशन यांनी सुरू केलेले हे ज्ञानपिठ गुरुकुल आधार आश्रम आहे. या आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुलं-मुली वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकच्या माने नगर येथे द किंग फाउंडेशनने ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हे आधार आश्रम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात असून मुला-मुलींना वेगवेगळ्या इमारतीत ठेवल्याने पोलिसांना संशय बळावला आहे.
या प्रकारणी मोर नामक एका व्यक्तीला नाशिकच्या म्हसरूळ पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून अधिकच तपास केला जात आहे.
अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्यात पोस्को कायद्या अंतर्गत बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एका आधार आश्रमातील घटनेने खळबळ आहे.