माता न तू वैरिणी ! प्रेमात एवढी आकंठ बुडाली की ममतेचाही विसर पडला, मग पोटच्या गोळ्यालाच…

| Updated on: Apr 08, 2023 | 9:59 PM

महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरु होते. पाच वर्षाच्या मुलीला आईच्या अनैतिक संबंधाबाबत मुलीला कळले. यामुळे आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती मुलगी कुणाला सांगेल अशी आईच्या मनात भिती निर्माण झाली.

माता न तू वैरिणी ! प्रेमात एवढी आकंठ बुडाली की ममतेचाही विसर पडला, मग पोटच्या गोळ्यालाच...
अनैतिक संबंधासाठी आईनेच मुलीला संपवले
Follow us on

जालौन : प्रेमसंबंध हे केवळ कॉलेज विश्वपुरते मर्यादित राहिलेले नाही. अलीकडच्या काळात तर विवाहानंतर प्रेम जडण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा विवाहबाह्य प्रेमसंबंधातून गुन्हेगारीचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशाच प्रेमसंबंधातून एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याला जिवंत मारले. उत्तर प्रदेशातील जालौन परिसरात 4 एप्रिलला ही धक्कादायक घटना घडली. महिलेचा बॉयफ्रेंड घरी आला होता आणि ही गोष्ट तिच्या पाच वर्षांच्या मुलीने पाहिली. मुलगी आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा सगळीकडे उलगडा करेल या भीतीने विवाहितेने स्वतःच्या मुलीची हत्या केली.

प्रेमामध्ये आंधळे होऊन जन्मदात्या मातेनेच पोटच्या मुलीचा जीव घेतल्याने जालौन परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. महिलेने मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तिची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

बॉयफ्रेंडसोबत मुलीने पाहिले म्हणून संपवले

आरोपी महिलेच्या घरात तिचा बॉयफ्रेंड आला होता. महिलेने आपल्या विवाहबाह्य संबंधाची कुणालाच कुणकुण लागू दिली नव्हती. तिचा ‘चोरी चोरी चुपके चुपके’ विवाहबाह्य संबंधाचा कारनामा सुरू होता. घटना घडली त्या दिवशीही महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरामध्ये प्रेमाचे रंग उधळत होती. याचदरम्यान महिलेची मुलगी बाहेरून घरामध्ये आली आणि तिने आईला बॉयफ्रेंडसोबत पाहिले.

हे सुद्धा वाचा

मुलगी याबाबत शेजाऱ्यांना तसेच नातेवाईकांना माहिती देईल, या भीतीने महिलेने स्वत:च्या मुलीची हत्या केली. माधवगढ कोतवाली क्षेत्रातील सिरसा दोगढी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पित्याने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला असता, गावातील एका जुन्या रुग्णालयाच्या मागील झुडपामध्ये मुलीचा मृतदेह सापडला.

तपासासाठी विशेष पोलीस पथक

पाच वर्षांची मुलगी रहस्यमयरित्या गायब झाल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू केली होती. यासाठी स्थानिक पोलिसांचे एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पोलीस पथकाने आसपासच्या रहिवाशांचे जबाब नोंदवून घेतले. यादरम्यान तक्रारदार अश्वनी कुमार दुबेचा शेजारी असलेल्या नेत्रपाल याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले.

नेत्रपालला खाकी दंडुक्याचा प्रसाद मिळताच त्याने संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील पोलिसांना सांगितला. त्याआधारे मुलीची आई राधा दुबेला अटक करण्यात आली असून, नेत्रपालचीही सखोल चौकशी केली जात आहे.