नाशिक : चोरीच्या विविध प्रकारच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण नाशिकमध्ये चोरीची ( Nashik Crime ) आगळी वेगळी घटना घडली असून ती चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकदा तुमच्या कानावर मोबाईल चोरणे, पेट्रोल चोरणे, दुचाकी चोरणे, वाहनांची तोडफोड करणे अशा घटना आल्या असतील. पण नाशिकमध्ये वाहनांची चाके चोरीला ( Tyre Theft )जाण्याच्या घटना समोर येत आहे. उभ्या स्थितीत असलेल्या वाहनांचे चाके चोरी करून नेण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. रिक्षाचे चाके चोरीला गेल्याच प्रकार समोर आल्याने नाशिकमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या नानावली परीसरात घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाचे चाके काढून नेण्यात आले आहे. चाकू काढून घेत वाहने जमिनीवर ठेवून पोबारा होत आहे. गेल्या आठ दिवसांत तीन ते चार वाहनांचे चाके चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे.
यापूर्वी नाशिक शहरात आणि जिल्ह्यात पेट्रोल चोरी, वाहनांची तोडफोड, सीट फाडणे अशा घटना समोर आल्या आहेत. पण काही दिवसांपासून नवी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या अंधारात फक्त चाके चोरण्याची टोळी सक्रिय झाली आहे.
या प्रकारामुले वाहन धारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिक्षाचे चाके खोलण्यासाठी सोपे असल्याने चोरटे रीक्षांना लक्ष करीत आहे. यामध्ये काही तरुण नशेत अशा चोरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नानावली येथील मोईनुद्दीन सय्यद यांच्या रिक्षाचे चाके चोरीला गेली आहे. त्यांच्या एमएच 15 एफयू 3043 या क्रमांकाच्या रिक्षाची चाके चोरीला गेली आहे. शनिवारी सकाळी रिक्षा घेऊन कामावर जात असतांना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला आहे.
याच परिसरात एक रिक्षा आणि एका कारचे चाके चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. आगळ्या वेगळ्या चोरीच्या घटणेने भितीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
एका रात्रीत रिक्षाचे तिन्ही चाके काढून घेतल्यावर रिक्षा कशी घेऊन जायची, आणि अशी चोरी कोण करतं म्हणून रिक्षा चालकाला हसावं की रडावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळात पोलीसांच्या तपासात काही समोर येतं का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वीही नाशिक शहरातील शिवाजीनगर परिसरात अशी घटना समोर आली होती. त्यावेळी रिक्षा चालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली होती.