रेल्वे स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत होता, पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली तर…

| Updated on: Jun 23, 2023 | 6:19 PM

पोलिसांना एक इसम संशयितरित्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकात संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली.

रेल्वे स्थानक परिसरात संशयितरित्या फिरत होता, पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली तर...
नायजेरियन नागरिकाला ड्रग्जसह अटक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान ग्रँट रोड स्थानकावर संशयितरित्या फिरणाऱ्या एका नायजेरियन इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 56 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची बाजारात किंमत 11 लाख रुपये आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता तो भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा आरोपी नालासोपारा येथे वास्तव्यास होता. त्याच्याविरोधात नालासोपारा परिसरातही अनेक गुन्हे दाखल आहेत. याआधीही आरोपीला काशीमीरा पोलिसांनी दोन वेळा अटक केली होती.

संशयिताला ताब्यात घेत झडती घेतली

अंमली पदार्थ खरेदी, विक्रीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथक ठिकठिकाणी ड्रग्ज तस्कारांचा शोध घेत आहेत. यादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटला ग्रँट रोड रेल्वे स्टेशन परिसरात एक नायजेरियन नागरिक संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ड्रग्ज आढळून आले.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशी कुमार मीना, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप काळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक शैलेश देसाई आणि पोलीस पथकाने सदर कारवाई पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल कदम करत आहेत.

हे सुद्धा वाचा