नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील एक धक्कादायक ( Nashik News ) प्रकार समोर आला आहे. रुग्णाची महिला नातेवाईक आणि परिचर यांच्यात तुंबळ ( Nashik Civil Video ) हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकावर पोलीसांनी कारवाई करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचर रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे याहून झाला वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील हाणामारी समोर आल्यानंतर आरोग्य क्षेत्रात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईक आणि परिचर यांच्यात वाद झाला होता. साफसफाई करत असतांना उद्धटपने बोलल्याने हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाद सुरू असतांना एकमेकींनी शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट हाणामारीच झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी उपस्थित इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ काढले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे.
त्यानंतर परिचर महिलेला मारहाण झाल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले असून पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. जो पर्यन्त पोलिस कारवाई करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन केले जाईल अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हाणामारी, परिचारिका आणि रुग्णाची नातेवाईक महिला एकमेकींना भिडल्या, व्हिडिओ व्हायरल… #nashiknews #civilhospital #viralvideo pic.twitter.com/nVxV5gLbOe
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 1, 2023
जिल्हा रुग्णालयातील परिचर आणि रुग्णाची नातेवाईक असलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे या वरुन हा झाला वाद झाल्याची माहिती समोर येत असली तरी दुसरीकडे यातील तथ्य काय आहे हे चौकशीतच समोर येईल त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.