वॉशिंगमशिनमध्ये दीड वर्षांचे बाळ पडले तरी वाचले, वाचविणारे डॉक्टर म्हणाले चमत्कार

| Updated on: Feb 15, 2023 | 10:30 AM

रूग्णालयात बाळाला आणले तेव्हा त्याची  प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्याला न्युमोनिया झाला होता. त्याच्या फुप्फुसाचे कार्य बिघडले होते.

वॉशिंगमशिनमध्ये दीड वर्षांचे बाळ पडले तरी वाचले, वाचविणारे डॉक्टर म्हणाले चमत्कार
washing
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : वॉशिंग मशिनमध्ये पडलेल्या एका दीड वर्षांच्या बाळाला डॉक्टरांनी मोठ्या महत्प्रयासाने वाचवले आहे. वॉशिंग मशिनच्या शॉप वॉटरमध्ये हे बाळ पडले, सुमारे पंधरा मिनिटे ते पाण्यातच होते. त्याला कोणी पाहीले नाही. दुर्घटनेनंतर सात दिवस हे बाळ कोमात होते. नंतर उपचाराअंती डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविले. अजून काही मिनिटे उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

पेडीयाट्रीक डॉ.राहूल नागपाल यांनी सांगितले की जेव्हा या बाळाला रुग्णालयात आणले तेव्हा परिस्तिथी बिकट होती, या बाळाला जेव्हा रूग्णालयात आणले गेले तेव्हा त्याची प्रकृती नाजूक होती. ते बेशुद्ध पडले होते. बाळ काहीच प्रतिसाद देत नव्हते. त्याला थंडी तसेच श्वास घेताना त्रास होत होता. त्याच्या शरीराचा रंग निळा पडला होता. हद्याचे ठोके मंद झाले होते. बीपी आणि पल्स रेट नव्हते.

बाळाच्या आईने सांगितले की ते टॉप लोडींग मशिनच्या आत पडून पंधरा मिनिटे झाली होती. मशीनचे झाकण उघडे होते. त्याची आई घराबाहेर गेली होती. ती आली तेव्हा घरात मुल दिसत नव्हते. बाळाने खुर्चीवर चढून ते वॉशिंगमशिनमध्ये पडले असावे असा संशय आहे. डॉक्टरांनी सांगितले की आणखी उशीर झाला असता तर त्याला वाचवता आले नसते.

रूग्णालयात बाळाला आणले तेव्हा त्याची  प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्याला न्युमोनिया झाला होता. त्याच्या फुप्फुसाचे कार्य बिघडले होते. त्यात केमिकल गेल्याने ते ब्लॉक झाले होते. आतड्यात इंन्फेक्शनही झाले होते. परंतू आवश्यक अॅंटीबायोटीक आणि आयव्ही फ्लुड सपोर्टने हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.

बाळाने हळूहळू आईला ओळखणे सुरू केले. सात दिवस हे बाळ आयसीयूमध्ये होते. बारा दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बाळाच्या ब्रेनचा सीटी स्कॅन करण्यात आला होता, परंतू तेथे काही इन्फेक्शन आढळले नाही. दिल्लीच्या वसंत कुंज परीसरात ही घटना घडली होती. तर फोर्टीसमध्ये या बाळाला दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी यास चमत्कारच म्हटले आहे.