Nashik Crime : सर्वसामान्य माणसाची फसवणूक ( Cyber Crime News) झाली तर त्याचे अज्ञात किंवा त्याला माहिती नसावी म्हणून एकवेळेला फारशी चर्चा होत नाही. मात्र, पेशाने प्राध्यापक असलेल्या व्यक्तीची फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बंद पडलेल्या 03 विमा पॉलिसींचा ( lapsed insurance policies ) मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका प्राध्यापकाला तब्बल १७ लाख आठ हजार १५७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. गंडा घातल्याचा हा धक्कादायक नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. फसवणूक झाल्याची बाब प्राध्यापकाच्या लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, त्यावरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर शांती पार्क येथील गज्जर अपार्टमेंटमध्ये राहणारे किशोर कुमार शिवप्रसाद चौबे असे फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
भुजबळ नॉलेज सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून किशोर कुमार शिवप्रसाद चौबे नोकरीला आहेत. चौबे यांनी मागील वर्षी ऑनलाइन पद्धतीने खाजगी बँकेची तीन लाख रुपये किमतीची दहा वर्षांसाठी विमा पॉलिसी काढली होती.
चौबे यांनी प्रारंभी काही हप्ते भरल्यानंतर त्या पॉलिसीचे पुढील हप्ते भरले नव्हते. पॉलिसी पुनः सुरू करण्यासाठी दिल्लीच्या कार्यालयात त्यांनी तक्रार केली होती.
काही महिन्यांनी दिल्लीच्या कार्यालयातून जुन्या तक्रारीवरून बंद पडलेली पॉलिसी सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती.
किशोर कुमार शिवप्रसाद चौबे यांची संशयित आलोक जैन, विवेक कश्यप, ओमप्रकाश भार्गव, स्वाती देसाई यांनी फसवणूक केल्याचे म्हंटले आहे.
वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन फोन केले. बंद पडलेल्या तीन पॉलिसी कायमस्वरूपी बंद करून त्याचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
जीएसटी, मॅच्युरिटी बेनिफिट, सिल्वर गोल्ड लिमिट क्रॉस, बोनस अशी विविध कारणे संशयितांनी सांगून चौबे यांची फसवणूक करण्यात आली आहे.
संशयित चौघांना चौबे यांची तब्बल १७ लाख ८ हजार १५७ रुपये बँकेच्या खात्यात घेऊन फसवणूक केली.