रॉ अधिकाऱ्याची दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

| Updated on: Nov 14, 2022 | 9:45 PM

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती कळेल.

रॉ अधिकाऱ्याची दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
रॉ अधिकाऱ्याची दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या
Follow us on

दिल्ली : रॉ अधिकाऱ्याने कार्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील लोधा कॉलनी परिसरात घडली आहे. अधिकाऱ्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

नेमके कारण अद्याप कळू शकले नाही

हे एक हायप्रोफाईल प्रकरण मानले जात आहे. रॉ अधिकाऱ्यानेच आत्महत्या केल्याची घटना गंभीर आहे. अधिकारी तणावात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र अधिकारी नेमका कोणत्या कारणामुळे तणावात होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती कळेल. अधिकाऱ्याचे नाव कळू शकले नाही.

हे सुद्धा वाचा

तपासानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट केले

रॉ अधिकाऱ्याची आत्महत्या ही संवेदनशील घटना असल्याने पोलीस सध्या यावर अधिक बोलणे टाळत आहेत. सध्या पोलीस प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत. तपासानंतरच अधिकारी घरगुती कारणामुळे तणावात होती की ऑफिसमधील काही समस्या होत्या, याबाबत खुलासा होईल.