अल्पवयीन मुलीस खरेदीच्या आमिषाने शहरात आणलं, 22 आठवड्यांची गर्भवती राहिली तरी आरोपीचं नावं सांगेना

| Updated on: Nov 21, 2022 | 2:04 PM

आपली मुलगी गरोदर असल्याची बाब तिच्या पोटावरून दिसून आल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटणेचं भिंग फुटलं आहे.

अल्पवयीन मुलीस खरेदीच्या आमिषाने शहरात आणलं, 22 आठवड्यांची गर्भवती राहिली तरी आरोपीचं नावं सांगेना
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याने आरोग्य विभागासह पोलीस दलाची डोकेदुखी वाढली आहे. एक अल्पवयीन मुलगी तब्बल 22 आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. जीवे मारण्याची धमकी बलात्कार केलेल्या व्यक्तीने दिल्याने पीडित तरुणीने संबंधित व्यक्तीचं नावही पोलिसांना सांगत नाहीये. पीडित तरुणीचे पोट पुढे दिसू लागल्यानं आईला शंका आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीला ओळखीतीलच व्यक्तीने खरेदीचे आमिष दाखवून म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फ्लॅटमध्ये बलात्कार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, जीवे मारण्याची धमकी संशयित व्यक्तीने दिली असल्याने पीडित नाव सांगत नसल्याने आरोपीचा शोध कसा घ्यायचा याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे पीडितेला नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रीतसर प्रक्रिया करून गर्भपात केला गेलाय.

नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उशिराने उघडकीस आली आहे.

आपली मुलगी गरोदर असल्याची बाब तिच्या पोटावरून दिसून आल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटणेचं भिंग फुटलं आहे.

हे सुद्धा वाचा

जीवे मारण्याच्या धमकीमुळे पीडित मुलीने ही बाब घरी सांगितली नव्हती, इतकंच काय तर घटना कशी घडली आहे ? हे सांगत असून संबंधित व्यक्तीचे नाव सांगत नाहीये.

पीडित मुलीला नाशिकमध्ये खरेदी करण्याच्या बहाण्याने आणून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती, मात्र हे कुणाला सांगितल्यास मी मारून टाकील अशी धमकी तिला दिल्याने ती नाव सांगत नाही.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी आता महिला बाल कल्याण विभागाकडून मनोसपचार तज्ञांची मदत घेतली जाणार असून पुढील तपास केला जाणार आहे.