मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण काय?

| Updated on: Jun 17, 2023 | 1:34 PM

ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरटीओच्या कारवाईमुळे हताश झालेल्या एक रिक्षाचालकाने थेट मुख्यमंत्र्यांचा बंगला गाठला, मग जे घडले त्याने एकच खळबळ उडाली.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कारण काय?
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Image Credit source: TV9
Follow us on

निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे : ठाण्यात धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका रिक्षाचालकाने चक्क मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरच रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आरटीओने त्याचा रिक्षा परवाना रद्द केल्याने हताश होऊन रिक्षाचालकाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील दुर्घटना टळली. ठाणे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे सदर रिक्षाचालक हा कोपरी पाचपाखाडी परिसरात शिवसेना पदाधिकारी आहे. विनय पांडे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

रिक्षा चालकावर गुन्हे दाखल असल्याने परवाना रद्द

विनय पांडे या रिक्षाचालकावर अनेक गुन्हे दाखल असल्याने आरटीओने त्याचा रिक्षा परवाना रद्द केल्याची प्राथमिक माहिती मिळते. आरटीओने रिक्षा परवाना रद्द केल्याने पांडे हताश झाला. यानंतर त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला गाठला अन् आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी सदर रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वागळे इस्टेट पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा