फॅमिलीसह डॉक्टर हिल स्टेशनवर फिरायला गेला आणि नोकराने सोने आणि हिऱ्यांचे दागिने पळविले

| Updated on: Jan 01, 2025 | 2:28 PM

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण फिरायला बाहेरगावी जातात. परंतू नोकरांवर घर सोपवून जाणे एका डॉक्टरासाठी महागात पडले आहे. या नोकराने घरातील सर्व दागिने आणि रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे.

फॅमिलीसह डॉक्टर हिल स्टेशनवर फिरायला गेला आणि नोकराने सोने आणि हिऱ्यांचे दागिने पळविले
crime scene
Follow us on

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण हवापालटासाठी  मुंबई बाहेर एखाद्या हिल स्टेशनवर जात असतात. परंतू नोकरांवर घर सोपवून जाणे एका डॉक्टरासाठी महागात पडले आहे. या नोकराने घरातील सर्व दागिने आणि रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. लोणावला येथे फिरायला जाताना घरातील नोकरांवर विश्वास ठेवणाऱ्या डॉक्टर फॅमिलीला चांगला भूर्दंड  बसला आहे. मुंबईतील या डॉक्टराच्या घरातून हिरे जडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असे एकूण ८.५ लाख रुपयांची चोरी झाली आहे.  चोरीच्या या आरोपाखाली एका घरगुती नोकराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की पोलिस या नोकराची आता चौकशी करीत आहे.

अंधेरीतील पॉश लोखंडवाला परिसरात राहणार्‍या ७३ वर्षांचे डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह २५ ते २७ डिसेंबर दरम्यान लोणावळा हिल स्टेशनवर फिरायला गेले होते. ते जेव्हा घरी परत आले तेव्हा कपाटातून ४.५ लाख रुपयांचे दागिने आणि चार लाखाची रोकड गायब झाली होती. त्यांच्या एका मोलकरणीने सुधांशु यादव हे सहायक दैनंदिन काम करुन निघून गेल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

चोरी केल्याची कबूली दिली पण….

२७ डिसेंबर रोजी जेव्हा डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबिय परत आले तेव्हा घरातील कपाटातील दागिने आणि रोकड नाहीशी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या घरात एक सहायक म्हणून काम करणाऱ्या सुधांशू यादव यांना घरात बोलविले. जेव्हा डॉक्टरांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्याने चोरी केल्याची कबूली दिली. परंतू दागिन्याचा ठावठिकाणा सांगण्यास नकार दिला. त्यानंतर मग डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन शनिवारी सुधांशू यादव याला अटक केली. आणि त्याची पुढील चौकशी सुरु आहे.