हरियाणा : हरियाणातील यमुनानगरमध्ये एक थरारक घटना उघडकीस आली आहे. लग्न समारंभावरुन घरी परतणाऱ्या कुटुंबाच्या स्कूटीला भरधाव होंडा सिटी कारने जोरदार धडक दिल्याची (Honda City Car Hit Scooty) घटना घडली आहे. धडक इतकी जोरदार होती की, स्कुटीवर बसलेले तिघे जण काही फूट उंच हवेत उडाले आणि जमिनीवर आदळले. या घटनेनंतर कारचालक फरार (Car Driver Absconding) झाला आहे. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्हीत कैद (Incident caught in CCTV) झाली आहे.
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्कूटी बसलेले आई, वडिल आणि मुलगा जखमी झाले आहेत. पत्नी गंभीर जखमी असून पतीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल जखमींना रुग्णालयात नेले. गंभीर जखमी पत्नीला पीजीआय चंदीगढला रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका होता की स्कूटी चालकाला सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही.
घटनेवेळी चालक नशेत होता का हे हे कार चालकाला अटक केल्यानंतरच कळेल. सध्या पोलीस या काळ्या रंगाच्या होंडा सिटी कारचा शोध घेत आहेत. अपघातावेळी कारची नंबरप्लेट घटनास्थळी पडली. या नंबरप्लेटच्या आधारे लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.