जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अंगावर काटा आणणारी एक घटना उघडकीस आली आहे. स्कूटीवरुन चाललेल्या एका कुटुंबाला भरधाव वेगात आलेल्या एका महिंद्रा थार एसयुव्हीने जोरदार धडक (Mahindra Thar Suv hit Scooty) दिली. ही धडक इतकी जोरदार होती की स्कूटीवरील तीनही जण जखमी (Three Injured) झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद (Incident Caught in CCTV) झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या अपघात प्रकरणी गोराबाजार पोलिसांनी थारच्या चालकाला अटक केली आहे. तसेच त्याची गाडीही जप्त केली आहे. या अपघातात स्कूटीवरील वडिल, मुलगा आणि मुलगी जखमी झाले आहेत.
जबलपूरमधील बिलहारी परिसरात मंगळवारी रात्री स्कूटीवरुन वडिलासंह आणि दोन मुले आपल्या घरी चालली होते. यावेळी बिलहारी परिसरात रस्ता क्रॉस करण्यासाठी ही स्कूटी थांबली. ते दुसरी गाडी पुढे जाण्याची प्रतिक्षा करत होते.
इतक्यात समोरुन एक भरधाव थार एसयुव्ही आली आणि तिने या स्कूटीला समोरुन जोरदार धडक दिली. घटना इतकी भयंकर होती की पाहून अंगावर काटा उभा राहिल. थार चालकाने स्कूटीला धडक देत तिघांनाही चिरडत गाडी वेगात पुढे नेली.
घटना पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींच्या दिशेने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही सर्व थरारक घटना तेथील एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
स्कूटीला धडक दिल्यानंतर थार चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नागरिकांनी त्याला घेरले आणि गोराबाजार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसाांनी कार चालकाला अटक करत त्याची गाडीही जप्त केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.