स्टेशनहून पायी घरी परतणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र खेचून चोरट्याचा पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Jan 09, 2023 | 8:44 PM

कानसईच्या डॉक्टर लापसीया यांच्या दवाखान्यासमोर त्या येताच दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र ओढलं आणि पळून गेला.

स्टेशनहून पायी घरी परतणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र खेचून चोरट्याचा पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद
महिलेचे मंगळसूत्र खेचून चोरट्याचा पोबारा
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथच्या कानसई परिसरात लुटमारीच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने एका महिलेचं मंगळसूत्र खेचल्याची घटना घडली आहे. मंगळसूत्र हिसकावत चोरट्याने पोबारा केला. कानसई परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

पायी घरी जात असताना लुटले

अंबरनाथच्या कानसई दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या पल्लवी इजारे या महिला त्यांच्या मुलीसह स्टेशनहून पायी आपल्या घराकडे येत होत्या. कानसईच्या डॉक्टर लापसीया यांच्या दवाखान्यासमोर त्या येताच दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र ओढलं आणि पळून गेला.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु

लुटीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र चोरट्याने हेल्मेट घातलेलं असल्याने, तसेच त्याच्या दुचाकीला नंबर प्लेटही नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

याआधीही घडली होती दरोड्याची घटना

धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात यापूर्वी एका महिला डॉक्टरच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. तसेच ज्या लापसीया हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला. त्याच हॉस्पिटलमध्ये यापूर्वी सशस्त्र दरोडा देखील पडला होता. त्यानंतरही पोलिसांकडून कानसई परिसरात योग्य प्रकारे गस्त ठेवली जात नसल्याचंच या प्रकारानंतर समोर आलं आहे.