रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताला पर्यटक लोणावळ्यात मोठा प्रमाणात गर्दी करत असतात. मुंबईवरुन आलेल्या एका पर्यटकाला हे सेलिब्रेशन चांगलंच भोंवले आहे. पार्किंगच्या वादातून त्याला स्थानिकांनी जबर मारहाण केली आहे. विशेष म्हणजे यावेळी गाडीचीही तोडफोड केली आहे. पर्यटक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर असून लोणावळा पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून फरार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे. 31 डिसेंबरला निरजकुमार तिवारी आणि त्यांचे चार मित्र नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात आले होते. मध्यरात्री भूक लागली म्हणून ते मॅगी पॉइंटवर आले होते. त्यावेळी त्यांनी बाजूलाच त्यांची चारचाकी गाडी पार्क केली, पण याच पार्किंगच्या मुद्द्यावरून काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. हा वाद इतका टोकाला गेला की यामध्ये थेट हाणामारीच झाली. यामध्ये स्थानिक असलेल्या तरुणांनी तिवारी यांना यामध्ये कोयत्याने वार करत जबर मारहाण केली आहे.
लोणावळ्यात 31 डिसेंबरला गाडी पार्किंगला का लावली असं म्हणत पर्यटकांशी हुज्जत घालत केले काही तरुणांनी कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
लोणावळ्यात झालेल्या या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आला आहे. लोणावळा शहर पोलीसांनी याबाबत स्थानिक रहिवासी असलेल्या रोहण गायकवाड, इम्मू शेखसह आणि दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीच्या घटनेत नवी मुंबईतील पर्यटक निरजकुमार तिवारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे.
निरजकुमार तिवारी आणि त्यांचे चार मित्र नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात आले होते 31 डिसेंबरच्या रात्री 1 वाजता भूक लागली म्हणून ते मॅगी पॉईंटवर आले होते.
लोणावळ्यात 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतला आलेल्या पर्यटकाला स्थानिकांनी केली जबर मारहाण, पर्यटक जखमी हल्लोखोर फरार #lonavala #crime #cctv #tourist #NewYear #Police pic.twitter.com/eHTkZ2cutY
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) January 3, 2023
पार्किंग करत असतांना समोर उभे असलेल्या स्थानिक तरुणांनी या ठिकाणी वाहन का उभे केले म्हणून हुज्जत घालण्यात सुरुवात केली, नंतर थेट हाणामारीच सुरू झाली.
स्थानिकांनी यामध्ये निरजकुमार आणि त्याचे मित्र हर्ष यांना कोयत्याने गंभीर मारहाण करत वाहनांची तोडफोड केली जखमी करत फरार झाले
पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर गुन्हा दाखल करत संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनं लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून जोरदार चर्चा आहे.