‘ये एरिया मेरा है, मैं यहाँ रेहता हू, कही भी बैठ सकती हू’ म्हणत तरुणाचा थेट रेल्वे ट्रॅकवर ठिय्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jun 13, 2023 | 11:29 AM

कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर एका नशेडी तरुणाने गोंधळ घातल्याने काही वेळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. या तरुणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ये एरिया मेरा है, मैं यहाँ रेहता हू, कही भी बैठ सकती हू म्हणत तरुणाचा थेट रेल्वे ट्रॅकवर ठिय्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात काल झालेल्या गोंधळ प्रकरणी आज एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्लेटफॉर्म क्रमांक 1 च्या रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाने रेल्वे ट्रॅकमध्ये गोंधळ घातलेला दिसत आहे. ‘ये एरिया मेरा है, मैं यहा रेहता हू, कही भी बैठ सकती हू’, असे सांगत तरुण थेट रेल्वे ट्रॅकमध्ये बसला. दरम्यान, कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने सतर्कता बाळगत ट्रेन थांबवून त्या तरुणाचा जीव वाचवला. तरुणाला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला काढत रेल्वे ट्रॅकवरुन तरुणाला बाजूला करत ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना केली. दरम्यान, तरुण नशा करून रेल्वे ट्रॅकवर बसल्याची माहिती प्रवाशांनी दिली असून, या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

काल सकाळी 8 वाजून 50 मिनिटाच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन प्लेटफॉर्म क्रमांक 1 च्या शेवटी रेल्वे खांब क्रमांक k-34 दरम्यान एका तरुणाने रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडला. याच दरम्यान कल्याणवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी ट्रेन कल्याण स्टेशनवरून सुटली. ट्रेन आपला वेग पकडण्याच्या आधीच मोटरमनला रेल्वे ट्रॅकवर तरुण बसलेला दिसून आला. मोटरमनने तात्काळ ट्रेन थांबवत ट्रेनमधून खाली उतरून या तरुणाला कोण आहेस आणि इतर का बसलायस? असे विचारले. यावर तरुणाने ‘मी इथे राहतो, हा माझा एरिया आहे, मी कुठेही बसू शकतो’, असे सांगितले.

दरम्यान मोटरमनने या तरुणाचा जीव वाचवत स्टेशन परिसरातील लोकांना त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगत पुढचा प्रवास सुरू केला. दरम्यान, या तरुणांनी नशा करून हे कृत्य केले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहे.

हे सुद्धा वाचा