नाशिक : मंत्री, खासदार, आमदार आणि पुढाऱ्यांचा नेहमी राबता असलेल्या हॉटेल एक्सप्रेस इन मधील एका वेटरने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. वेटरने हॉटेल एक्सप्रेस इनच्याच आठव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नाशिकच्या अलिशान हॉटेल असलेल्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये वेटरने जीवन संपवल्याने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून आत्महत्या का केली असावी अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मूळचा सातारा येथील असलेल्या अतुल करंडे या 29 वर्षीय तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी घेत आपले जीवन संपवले आहे. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू झाला आहे. आत्महत्या आहे की हत्या अशा दोन्हीही अनुषंगाने तपास केला जात आहे. हॉटेलमधील मॅनेजर, आणि इतर सहकाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहे. मूळचा साताऱ्याचा असलेल्या अतुल करंडे याने हत्या करण्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकमधील पाथर्डी फाटा परीसारतील पांडवलेनी परिसरात हे अलिशान असं हॉटेल एक्सप्रेस इन आहे. येथे 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.
नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन येथे वेटर म्हणून काम करत असलेला अतुल करंडे हा मूळचा सातारा येथील आहे, त्याने आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे.
नेहमीच आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह राजकीय मंडळी यांच्यासह बड्या मंडळीचा नेहमीच राबता असल्याने या अलिशान हॉटेलची नेहमी चर्चा असते.
अतुल करंडे याने सोमवारी ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. मात्र, आत्महत्या का केली याबाबत कारण अस्पष्ट असले तरी पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
हॉटेलमधील अतुल करंडे याचे सहकारी, जिथे राहत होता तेथील व्यक्तींचा आणि हॉटेलमधील सीसीटीव्हीचा आधार घेऊन हा तपास केला जात आहे.
त्यामुळे अतुल करंडे याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली आहे. याबाबत इंदिरा नगरच्या पोलिसांना तपासात उत्तर द्यावे लागणार आहे.