आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीर चोरीला गेली; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 26, 2022 | 10:19 PM

आदिवासी विकास विभागाची नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे स्थित असलेल्या आश्रमशाळेलची टोलेजंग इमारत आहे. या आश्रमशाळेत सध्या जवळपास तीनशे विद्यार्थी वास्तव्यास असुन शिक्षणासह त्यांच्या राहण्याची सोयही ह्याच ठिकाणी आहे. मात्र याच ठाणेपाडा आश्रमशाळेच्या पाणी पुरवठ्या साठी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीर चोरीला गेली; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Follow us on

नंदुरबार : गेल्या काही वर्षांपूर्वी अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा एक चित्रपट लोकप्रिय ठरला होता जिथे जाऊ तिथे खाऊ त्या चित्रपटाची प्रमाणे नंदुरबार(Nandurbar) जिल्ह्यातील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा( well dug for an ashram school was stolen ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने विहीर खंदली असा दावा त्यांनी इतिवृत्तांतुन थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात केला. मात्र स्थानिक पुढाऱयांसह आश्रमशाळा प्रशासन गेल्या तीन वर्षांपासुन आश्रमशाळे रोज टॅन्करने पाणी पुरवठा करत आहे. त्यामुळे आश्रमशाळेची विहीरी रात्रीतुन गायब कशी झाली यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

आदिवासी विकास विभागाची नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे स्थित असलेल्या आश्रमशाळेलची टोलेजंग इमारत आहे. या आश्रमशाळेत सध्या जवळपास तीनशे विद्यार्थी वास्तव्यास असुन शिक्षणासह त्यांच्या राहण्याची सोयही ह्याच ठिकाणी आहे. मात्र याच ठाणेपाडा आश्रमशाळेच्या पाणी पुरवठ्या साठी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

32 लाखांचा निधी वर्ग करुनही योजना राबविण्यात सपशेल अपयश

सुरुवातीला आश्रमशाळा पाणी पुरवठा योजनाही ही जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत राबविल्या जात होती. याच आदिवासी विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला या आश्रमशाळेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 32 लाखांचा निधी वर्ग केला होता. मात्र चार वर्षांपासुन जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना ही योजना राबविण्यात सपशेल अपयश आले.

स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी यावर वारंवार विचारणे नंतर जिल्हा परिषदेच्या इतिवृत्ता संबंधीत विभागाच्या अधिकाऱयांनी या आश्रमशाळेसाठी विहीर खंदल्याच सांगत त्याला पाणीच लागले नसल्याच नमुद केले. आणि इथुनच खऱया अर्थान विहीर गायब होण्याच्या चर्चांना उधाण आले. जर अधिकारी शासकीय कागदावरती विहीर खंदली असा दावा करत असतील तर त्यांनी ती जागा दाखवावीच असा प्रश्न स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी करताच अधिकारी निरुत्तरीत झाले.

विशेष म्हणज आश्रमशाळेच्या आवारात काही विहीर अथवा पाण्याचा काही श्रोत आहे का याची पडताळणीसाठी ठाणेपाडा आश्रमशाळा परिसरात पाहणी केली. ही शाळेची इमारत बांधल्यापासुन या शाळेत पाण्याचा कायमचा श्रोतच नाही. त्यामुळे दिवसाला पाच ते सहा प्रमाणे महिन्याकाठी 200 टॅन्करद्वारे पाणी विकत मागवुन विद्यार्थ्याच्या पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न आदिवासी विकास विभाग भागवत आहे. शिवाय वसतीगृह अधिक्षकांसह सर्वच स्टाफने कधी पाण्यासाठी विहीर खंदली असे एकले सुद्धा नाही. उलट पाणी पुरवठा विभागाच्या या दाव्यानेच त्यांना धक्का बसला.

जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात आलेल्या विहिरीच्या विषयात तांत्रिक चूक झाली आहे त्यामुळे सदस्यांच्या काही गैरसमज झाला आहे अशी कुठलीही विहीर खोदली गेली नसल्याच्या आहे. मात्र आमचे प्रोसिडिंग मधली चूक माने केलं असली तरी प्रशासनाकडं आता सावरासावर करण्यात येत दिसून येत आहे मात्र अशा चुका होणं म्हणजे म्हणजे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला सारखा दिसून येत आहे.

मुळातच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीचे ठाणेपाडा आश्रमशाळेची विहीर मुर्तीमंत उदाहरण म्हणवी लागेल. हा सारा प्रकार समोर आल्यानंतर तोंडघशी पडलेल्या जिल्हा परिषदेने याबाबत काहीस बोलण्यास नकार देत चुप्पी साधलीय. तर दुसरीकडे आता चारवर्षानंतर ही योजना आदिवासी बांधकाम विभागाकडे वर्ग झाली आहे. मात्र या विहीर खंदण्यासाठी नेमके किती पैस खर्च झाले, कागदावरच विहीर खंदवुन ही चोरीला गेल्याचा दावा करणाऱया या भ्रष्ट्र यंत्रनेवर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.