यवतमाळ : शेतीच्या पैशातून वडील आणि विधवा मुलीमध्ये झालेल्या वादातून बापाने मुली (Daughter)ला बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील आर्णी तहसिलमध्ये घडली आहे. वडील आपली साडे चार एकर जमीन विकत होते. मुलीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुलगी पैसे (Money) मागण्यासाठी तहसिल कार्यालयात पोहचली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. उज्वला नंदू कालापाड असे विधवा मुलीचे नाव आहे, तर देवराव तुकाराम धनगर असे वडिलांचे नाव आहे. वडिलांच्या आजारासाठी मुलीने कर्ज काढून पैसे काढले होते. जमिन विकून मिळालेल्या पैशातून आपल्याला पैसे द्यावे अशी मुलीची इच्छा होती. मात्र वडिल त्यास तयार नव्हते.
उज्ज्वला नंदू कालापाड ही वाशिम जिल्ह्यातील सारशी येथील रहिवाशी असून ती विधवा आहे. तिला तीन अपत्ये आहेत. काही दिवसांपूर्वी उज्वलाचे वडील देवराव धनगर हे आजारी होते. त्यामुळे उज्वला हिने बचतगटातून एक लाख रुपये कर्ज काढून वडिलांचे उपचार करत त्यांना बरे केले. उज्वलाची घरची परिस्थिती बेताची असून मोलमजुरी करुन ती आपला आणि मुलांचा उदरनिर्वाह करते. देवराव धनगर यांची आर्णी तालुक्यातील यरमल हेटी येथे साडे चार एकर शेती आहे. ही शेती विकण्यासाठी वडिल आणि त्यांचे नातेवाईक आर्णी तहसिल कार्यालयात गेले होते. दरम्यान, याची माहिती मुलीला मिळाल्याने तिही पण आर्णी तहसिलमध्ये पोहचली. शेती विकल्यानंतर माझे एक लाख रूपये परत करा, अशी मागणी तिने वडिलांकडे केली. याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर बेदम मारहाणीत झाले. यावेळी वडिलांनी विधवा मुलीला बेदम मारहाण केली. (A widow was beaten up by her father due to a dispute over land money in Yavatmal)