हनिमूनला गेलेला तरुण रात्री अचानक बेशुद्ध झाला, पत्नीसह दागिने आणि पैसेही गायब; नंतर जे झाले त्याने पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

| Updated on: Jan 06, 2023 | 7:05 PM

पतीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याला पत्नी कुठेही दिसली नाही. त्याने रुममध्ये पाहिले असता पैसे आणि दागिनेही गायब होते. त्यानंतर पत्नीची शोधाशोध सुरु केली.

हनिमूनला गेलेला तरुण रात्री अचानक बेशुद्ध झाला, पत्नीसह दागिने आणि पैसेही गायब; नंतर जे झाले त्याने पतीच्या पायाखालची जमीनच सरकली
रिसेप्शनपूर्वीच नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
Follow us on

अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवविवाहित जोडपे उत्तराखंडला हनिमूनला गेले होते. मात्र हनिमूनला गेलेली नववधू फिल्मीस्टाईलने पतीला बेशुद्ध करुन प्रियकरासोबत पळून गेल्याने नवरदेवाच्या पायाखालची जमिनच सरकली. 28 नोव्हेंबर रोजी या जोडप्याचा विवाह झाला होता. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी हे जोडपे डेहराडूनला हनिमूनला गेले होते. तेथून मसुरी गेले आणि मग ऋषिकेशला पोहचले होते. तेथूनच नववधूने आपल्या प्रियकरासोबत पलायन केले.

आधी पतीला बेशुद्ध केले

ऋषिकेशला पोहचल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये जोडपे थांबले होते, तेथे रात्री नशेचे औषध नाकाला लावून तिने पतीला बेशुद्ध केले. त्यानंतर पैसे आणि दागिने घेऊन प्रियकरासोबत फरार झाली.

दागिने आणि पैसेही गायब

पतीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याला पत्नी कुठेही दिसली नाही. त्याने रुममध्ये पाहिले असता पैसे आणि दागिनेही गायब होते. त्यानंतर पत्नीची शोधाशोध सुरु केली. पण ती कुठेही सापडली नाही.

हे सुद्धा वाचा

पत्नीचा तपास करताना तिचा आधीच प्रेमविवाह झाल्याचे कळले

पतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पत्नी एकटीच कुठेतरी जात असल्याचे दिसले. यानंतर त्याने आपल्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. तसेच पत्नीच्या घरच्यांकडेही त्याने विचारणा केली मात्र ते या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत होते.

पत्नीचा तपास करत असताना त्याला पत्नीचा आधीच प्रेमविवाह झाला असल्याचे कळले. यानंतर तरुणाने याप्रकरणी पोलिसांकडे मदत मागितली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.