Haryana JJP MLA Slapping Case : हरियाणातील अनेक जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी गेलेल्या एका नेत्याला मात्र चपराक खावी लागली आहे. येथील जननायक जनता (JJP) पक्षाच्या आमदाराला एक महिलेने सर्वांसमोर जोरदार कानाखाली लगावल्याची (woman slapped MLA) घटना समोर आली आहे. ईश्वर सिंह असे त्यांचे नाव असून यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय विचित्र झाली होती. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
‘ पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी तेथे गेलो होतो. पण पाण्याच्या तडाख्यामुळे तेथील छोटा बांध तुटला होता. यामुळे गावकरी नाराज झाले होते व संतप्त गावकरी आणि काही महिलांनी हल्ला केला. आता तुम्ही इथे का आला आहात ? असा प्रश्न त्यांनी विचारला. मला याप्रकरणी कोणतीही कारवाई नको आहे, मी त्या महिलेला माफ केले आहे, असे ईश्वर सिंह यांनी स्पष्ट केले.’
#WATCH | Haryana: In a viral video, a flood victim can be seen slapping JJP (Jannayak Janta Party) MLA Ishwar Singh in Guhla as he visited the flood affected areas
“Why have you come now?”, asks the flood victim pic.twitter.com/NVQmdjYFb0
— ANI (@ANI) July 12, 2023
खरतर मुसळधार पावसामुळे हरियाणातील अनेक जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. कैथल, यमुनानगर, पंचकुला यासह अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ईश्वर सिंह गुहला कैथल येथे पोहोचले होते. तेथे गेल्यावर ते उपस्थित लोकांशी बोलत असताना एका महिलेने त्यांना रागाने कानाखाली लगावली. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळली.
गुहला विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ईश्वर सिंह कैथलच्या भाटिया गावात पोहोचले होते. मात्र तेथे उपस्थित असलेल्या महिला संतप्त झाल्या व त्यापैकी एकीने त्यांच्या कानाखाली मारली.