हरियाणा : पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कटुता किती जीवघेणे ठरू शकते, याचा प्रत्यय वेगवेगळ्या घटनांमधून येत आहे. समाजातील प्रतिष्ठित मानले जाणारे शिक्षक-डॉक्टर यांसारखे घटकही सध्या अनैतिक संबंधांमध्ये (Immoral Relation) अधिक अडकल्याचे स्पष्ट होत आहे. अशाच एका घटनेत हरयाणातील शिक्षकाच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत कट रचून शिक्षक पतीच्या हत्येचा कट (Plan to Husbands Murder) रचला. हा कट अन्य तिघांच्या साथीने यशस्वी केला आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात हरयाणा पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक (Haryana Police Arrested Four Accused) केली आहे.
हरियाणामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी घडलेल्या शिक्षक हत्याकांडातील कटाच्या उलगड्याने पोलिसांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गोदानामध्ये वर्दळीच्या परिसरात हे हत्याकांड घडले आहे.
हत्या झालेल्या शिक्षकाच्या पत्नीचे मागील दीड वर्षांपासून विवाहबाह्य संबंध सुरू होते. तिच्या या विवाहबाह्य संबंधाला पतीचा विरोध होता. त्यानंतर तिने तिच्या प्रेमसंबंधातील पतीचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी हत्येचा कट रचला.
या कटात तिने प्रियकराला विश्वासात घेतले. नंतर प्रियकर आणि अन्य दोघांच्या साथीने पतीला निर्जन स्थळी नेऊन त्याची हत्या करण्यात आली. आठ दिवसांनंतर या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महिलेने शिक्षक पतीची हत्या करताना पुरावे नष्ट करण्याचे पद्धतशीर नियोजन केले होते. महिला व तिच्या तीन साथीदारांनी शिक्षकाची हत्या केली. त्यानंतर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला हे भासवण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकला.
पोलिसांना ठसका गावातील रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला होता. उमेश निवासी मोहम्मदपूर असे हत्या झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सुरुवातीला उमेशचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज काढला होता. मात्र सखोल तपासादरम्यान उमेशच्या शरीरावर दुखापत झाल्याचे दिसले.
अधिक तपास सुरू असताना पोलिसांना पत्नीच्या हालचालींवर संशय आला. त्यावरून तिची कसून चौकशी केली असता तिचा हत्याकांडातील मुख्य सहभाग उजेडात आला.