पलामू : आजच्या आधुनिक जीवनात मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. तथापि मोबाईलचे चांगले आणि वाईट दोन्ही फायदे आहेत. कोरोनामुळे मोबाईलचा अधिक वापर होऊ लागला आहे. ऑनलाईन स्टडी, वर्क फ्रॉम होम या कारणांमुळे मोबाईलचा वापर अधिक वाढला. मात्र याचा परिणाम म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच मोबाईल अधिक अधीन झाले. मोबाईलच्या अतिवापरामुळे संसारातही भांडण होऊ लागली आहेत. अति मोबाईलचा वापर करण्यास मनाई केली तो अहंकाराचा प्रश्न बनला आहे. अशीच एक घटना झारखंडमधील पलामू येथे उघडकीस आली आहे. मोबाईलवरुन झालेल्या वादातून पतीने मोबाईल तोडला म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
पलामूमधील झूरहीटोला येथे पिंटू चौधरी आपली पत्नी चिंतादेवी विनयसोबत राहतो. चिंतादेवीला मोबाईलचे अत्याधिक व्यसन होते. ती सतत मोबाईलवर व्यस्त राहत होती. या कारणावरुन पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.
दररोजच्या वादातून पती पिंटूने पत्नीला मोबाईल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीने पत्नीचा मोबाईल तोडला. पतीने मोबाईल तोडल्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने खोलीत जाऊन साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
याबाबत रेहला पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी पतीसह सर्व कुटुंबीयांची चौकशी करत घटनेची नोंद केली आहे.
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. एका मोबाईलमुळे महिलेने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.