दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमध्ये (Business class) एका नामांकित महिलेच्या अंगावर प्रवाशाने (Passenger) दारुच्या नशेत लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. न्यूयार्क ते दिल्ली असा प्रवास महिला करीत होती. त्यावेळी बिझनेस क्लासमध्ये एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने महिलेला पाहून कपडे काढले, त्याचबरोबर नको त्या हरकती केल्या असल्याची तक्रार महिलेने दिली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन सुध्दा त्यांनी कसल्याची प्रकारची कारवाई केली नाही. ज्यावेळी विमान दिल्लीत पोहोचलं, त्यावेळी तो निघून गेला.
ज्यावेळी प्रवासी महिलेने टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली. त्यावेळी या घटनेच्या चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे मी त्यावेळी तक्रार करुन सुध्दा कोणतीही कारवाई झाली नाही असं पत्रात म्हटलं आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. तसेच माझ्या अंगावर सुद्धा लघुशंका केली. त्यावेळी माझ्यासोबत असलेल्या एका प्रवाशाने त्याने हटकले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी तिथून दुसरीकडे गेला. लघुशंका केल्यामुळे महिलेचे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या.
एअर इंडियातील सुरक्षा रक्षकांना प्रवाशांबाबत अजिबात जागृत नाही. अनेकदा तक्रार करुनही त्या इसमावरती कसलीही कारवाई केलेली नाही.