मुंबई : आपल्या स्वत:च्या घरी चोरी करून दागिने आणि रोकड पळविल्याचे वेगळेच प्रकरण पोलीसांनी उघडकीस आणत एका महिलेलाच या प्रकरणी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या 31 वर्षीय महिलेने सहा महिन्यांपूर्वी आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने दुसऱ्या पतीच्या घरातील दागिने चोरल्याचे हे प्रकरण कुरार पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने ही चोरीची योजना आखली होती. या महीलेने आपल्या दुसऱ्या पतीच्या घरातून 8.5 लाख रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. पोलिसांनी या चोरीचा कसा उलगडा केला हे महत्वाचे आहे.
‘मिडे डे’ ने दिलेल्या वृत्तानूसार हा प्रकार मालाड पूर्वेकडील ओमकार एसआरए सोसायटीतमध्ये एका दाम्पत्याच्या घरात घडला आहे. 7 मे 2022 रोजी ही महिलेने आपल्या दुसऱ्या पतीबरोबर सांगली येथील आपल्या गावी जाण्यापूर्वी ही स्वत:चेच घरफोडले. जेव्हा या महिलेचा पती इमारतीच्या खाली गाडी साफ करण्यासाठी गेला. त्यावेळी या महिलेने लॉकर तोडून दागिने आणि रोकड चोरी केली, त्यानंतर आतल्या दरवाजाला तुटलेला टाळा ठेवला आणि बाहेरचा दरवाजा लॉक केला आणि ते दोघेही गावी गेले.
गावाहून परतल्यावर गुन्हा उघड
13 मे रोजी ते दोघे आपल्या सांगली येथील गावाहून परतले तेव्हा महिला काही बहाण्याने बिल्डींगच्या खाली गेली. त्यामुळे पतीने दार उघडले तर आतल्या दरवाजा टाळा तुटला होता. तर लॉकरमधून 3.77 लाखाचे दागिने आणि 4.57 लाखाची रोकड गायब झाली होती. त्यामुळे पतीने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डीसीपी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेश गावडे, एपीआय पंकज वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले गेले.
पोलीसांचा महिलेवरच संशय
या प्रकरणाचा संशय पहिल्यापासून या महिलेवरच होता. कारण दरवाजाचा आतला टाळा तोडला होता. बाहेरच्या दरवाजालाही काही झाले नव्हते त्यामुळे चोरी घरातल्याच कोणी तरी केल्याचा पेलीसांना सुरूवातीपासून संशय होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून फिंगर प्रिंटचे नमूने घेतले. या फिंगर प्रिंटचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराची पत्नीला चौकशीसाठी पाचारण केले. मंगळवारी या महिलेने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर कुरार पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हा केल्याची कबूली दिली
महिलेने आपल्या जबाबात आपल्या पहिल्या पतीच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. महिलेचा पहीला पती आपल्या सतरा वर्षांच्या मुलासह मालवणी रहात असल्याचे उघडकीस आहे. तसेच या महिलेच्या पहिल्या पतीने आपल्या घरी यापूर्वीही अनेक वस्तू गायब झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. सध्या या महिलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.