गतीमंद दिराला उपचाराच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा, ‘असा’ अडकला भोंदूबाबा जाळ्यात

| Updated on: Nov 16, 2022 | 10:41 PM

काही दिवसांपूर्वी आरिफा हिची आसिफ हिंगोरी याच्याशी भेट झाली. आरिफने महिलेला तो जादूटोणा करुन सर्व आजार बरे करतो, तुमच्या दिरालाही बरे करणार असे आमिष दाखवले.

गतीमंद दिराला उपचाराच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा, असा अडकला भोंदूबाबा जाळ्यात
गतीमंद दिराला उपचाराच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : उपचार करण्याच्या नावाखाली जादूटोणा करुन लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आसिफ हिंगोरी असे या भोंदूबाबाचे नाव असून, या बाबाने आतापर्यंत किती लोकांना गंडा घातला आहे, याचा तपास बाजारपेठ पोलिसांनी सुरु केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख परिसरात मोहम्मद हिंगोरा हा पत्नीसह रहातो. मूळचा वर्ध्याचा असणारा मोहम्मद हा कोणाला घरात काही त्रास असेल, कोणाला काही व्याधी असेल त्या दूर करण्यासाठी जडी बुटी देत असे. त्यासाठी अगरबत्तीचा चुरा आणि तेलाचा वापर करत असे.

गतीमंद दिराला बरे करतो सांगितले

कल्याण पश्चिम बैलबाजार परिसरात राहणाऱ्या आसिफा मुलानी या महिलेचा दिर मनोरुग्ण आहे. काही दिवसांपूर्वी आरिफा हिची आसिफ हिंगोरी याच्याशी भेट झाली. आरिफने महिलेला तो जादूटोणा करुन सर्व आजार बरे करतो, तुमच्या दिरालाही बरे करणार असे आमिष दाखवले.

हे सुद्धा वाचा

महिलेकडून टप्प्याकडून 5 लाख उकळले

दिराला बरे करण्याच्या नावाखाली आसिफने आरिफाकडून टप्प्या टप्प्याने जवळपास 5 लाख रुपये उकळले. परंतु दीर काही बरा झाला नाही. तेव्हा तिला संशय आला. एप्रिल महिन्यात तिने पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेची पोलिसात धाव

जानेवारी 2022 ते 14 सप्टेंबरपर्यंत उपचार करुन देखील कोणताही फरक न पडल्याने आपली फसवणूक झाल्याचे आरिफा यांच्या लक्षात आले. आरीफा यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत मोहम्मद याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होता भोंदूबाबा

या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र कुणकुण लागताच आसिफ हा फरार झाला होता. आठ महिने आसिफ पोलिसांना गुंगारा देत होता. जास्तीत जास्त काळ तो संजय गांधी उद्यानातील जंगलात लपून बसत असे.

जंगलात लपून बसत असल्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपवते यांनी जलद गतीने तपास सुरु केला.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली अटक

गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार तो ठाण्यातील तीन हात नाका येथे येणार असल्याची माहिती रुपवते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ठाण्यातून मोहम्मद याला अटक केली. अखेर असिफला अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले.

आसिफने आणखी किती जणांना फसवले याचा तपास पोलीस करीत आहेत. बुधवारी मोहम्मद याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक रुपवते यांनी दिली.