शेतात काम करत असताना अंगावर वीज पडली, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

| Updated on: Mar 08, 2023 | 3:55 PM

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना इंदापूरमध्ये उघडकीस आली आहे. शेतात काम करत असताना ही घटना घडली.

शेतात काम करत असताना अंगावर वीज पडली, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

इंदापूर : शेतात काम करत असताना अंगावर पडल्याने 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील इंदापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील काटी येथे ही घटना घडली. ओंकार दादाराम मोहिते असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबातील एकुलता मुलगा होता. ओंकारच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंगावर टी-शर्ट जळाला होता

शहरात ढगाळ वातावरण कायम असून, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाउस येत होता. यावेळी काटीत रात्री दोन ठिकाणी वीज कोसळली. यावेळी ओंकारचा टी शर्ट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने गावकऱ्यांना वीज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

पोलीस भरतीची तयारी करत होता ओंकार

दरम्यान, ओंकार हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. तसेच दादाराम मोहिते यांना ओंकार आणि दोन मुली आहेत. काटीत एका नारळाच्या झाडावरही वीज कोसळली. त्यामुळे वीज कोसळल्यानेच ओंकारचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. त्याच्या जाण्याने काटीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण उघड होईल.

हे सुद्धा वाचा

हिंगोलीतही वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

हरबऱ्याची सुडी झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल हिंगोलीत घडली आहे. पिंटू गव्हाणे असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे पिंटूच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.