वसई : वसईच्या सुरुची बाग (Suruchi Baug) समुद्रात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडाल्या (Drowned)ची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सूरज गौड (25) असे समुद्रात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मित्रांसोबत पिकनिक (Picnic)साठी सुरुची बाग समुद्रकिनाऱ्यावर आला होता. घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस, वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत असताना आणि समुद्राला उधाण असतानाही पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे.
वसई पूर्व धुमाळ नगर येथील 8 तरुणांचा गृप सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर पिकनिकसाठी गेला होता. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यातील 2 तरुण समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यावर यातील एक तरुण बाहेर निघाला. मात्र दुसरा समुद्राच्या पाण्यात बुडाला. राज्यात सध्या पावसाचा हाहाःकार सुरु आहे. सुमद्राला उधाण आले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान विभागाकडून रेड आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. असे असतानाही तरुण समुद्रकिनाऱ्यावर पिकनिकसाठी जाताहेत. पाण्यात पोहण्याचा धोका पत्करत आहेत. ही पिकनिक तरुणांच्या जीवावर बेतत आहे.
नंदुरबारमध्ये परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन धरणात पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे अशी मयत तरुणांची नावे आहेत. मयत तरुण जिजामाता विद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकत होते. आज विद्यापीठाचा शेवटचा पेपर होता. पेपर दिल्यानंतर 8 मित्र विरचक्क धरणावर पोहायला गेले. धरणात पाणीसाठी कमी असल्याने खाली गाळ साचला आहे. या गाळात राहुल आणि कल्पेशचा पाय अडकल्याने ते बुडाले. (A young man who went on a picnic on the beach drowned Suruchi Baug in Vasai)