मुंबई | ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी मॉरिस भाई याने घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करत गोळ्या घातल्या होत्या. घोसाळकर यांना मारल्यानंतर मॉरिस भाई याने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. राज्यात आधीच गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना या गोळीबार प्रकरणाची चर्चा झाली. राजकीय वर्चस्वातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणातील मृत आरोपी मॉरिस याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच मॉरिस याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.
मॉरिस हा एक व्यावसायिक पोकर खेळाडू होता. दर दोन ते तीन महिन्यांनी लास वेगासला जायचा. या ठिकाणीच त्याने काही व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली होती. अमेरिकेमध्ये कॅसिनोमध्ये जात असायचा. मॉरिस राजकारणात येण्यासाठी पैसे खर्च करायचा. सत्यनारायण पूजा, दहिहंडवेळी चागंल्या प्रकारची देणगी द्यायचा. त्यासोबतच महिलांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजनही मॉरिस करत असल्याचं त्याची पत्नी सेरेनाने सांगितलं आहे.
क्रिकेट सामने असतील तर तो एका षटकारासाठी दोन हजार रूपये बक्षीस द्यायचा, त्यावेळी त्याला इतके पैसे कुठून आले विचारल्यावर पोकर खेळून जिंकल्याचं तो सांगायचा. कोरोना काळात मॉरिस याने मोठ्या प्रमाणात अन्नाचं वाटपं केलं होतं. इतकंच नाहीतर गरीबांसाठी मोफत उपाचारांचं आयोजनही तो करत होता, असं मॉरिस याच्या शेजाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला होता.
दरम्यान, मॉरिस याला राजकारणात एन्ट्री करायची होती हे यावरून दिसून येतं. मात्र बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये तो आतमध्ये गेला. तेव्हा मॉरिसचा असा समज होता की या प्रकरणात अडकवण्यामागे अभिषेक घोसाळकर यांचा हात होता. त्यामुळे जेलमधून सुटून शांत डोक्याने कट रचला आणि अभिषेक घोसाळकर यांना संपवलं.