नाशिक : नाशिक विभागात लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. मात्र सोमवारी झालेल्या एका कारवाईचा प्रकाश संपूर्ण राज्यात पडला आहे. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या क्लास वन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती ढालपे असं अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या एका सहकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. महावितरणच्या द्वारका परिसरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वीज मीटर, ट्रान्सफार्मर बसविणे या कामास मंजूरी देण्याच्या मोबदल्यात सरकारी ठेकेदाराकडे लाच माघितली होती. सरकारी ठेकेदाराने लाच मागितल्याची तक्रार नाशिक एसीबीकडे केली होती. एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली आहे. या कारवाईने मात्र संपूर्ण विद्युत विभागात खळबळ उडाली आहे.
नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाने महावितरण विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेतांना रंगेहाथ अटक केल्यानं खळबळ उडाली आहे.
द्वारका परिसरातील महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली असून महावितरणच्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सरकारी ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे लाच मागीतल्याची तक्रार दिली होती, त्यावरून एसीबीने सापळा रचला होता, त्या सापळ्यात महावितरणचे अधिकारी अडकले आहेत.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती ढालपेने 17 हजारांची लाच घेतली होती, त्याच वेळी ही कारवाई करण्यात आली असून त्यात एका सहकाऱ्याचाही समावेश आहे.
वीज मीटर, ट्रान्सफार्मर बसविणे या कामांच्या मंजुरीच्या मोबदल्यात सरकारी ठेकेदाराकडे ढालपेने लाच मागितली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईने विद्युत विभागात खळबळ उडाली आहे.