आरोपी आफताब ‘त्या’ गोष्टीत इतका तरबेज होता की… श्रद्धा हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासा!

| Updated on: Mar 07, 2023 | 9:14 PM

दिल्ली पोलिसांकडून सरकारी वकिलांनी साकेत कोर्टात आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी माहिती सांगताना धक्कादायक खुलासे केले आहेत. आफताबने सुका बर्फ आणि अगरबत्ती देखील मागवली होती.

आरोपी आफताब त्या गोष्टीत इतका तरबेज होता की... श्रद्धा हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासा!
श्रद्धा हत्याकांडातील 'ती' गोष्ट समोर आलीच! वकिलांनी न्यायालयात सांगितलं नेमकं काय झालं?
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतल्या महरौलीतील श्रद्धा वालकर हत्याकांड अजूनही कोणी विसरलेलं नाही. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्याविरोधात मंगळवारी साकेत न्यायालयात दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी बाजू मांडली. तेव्हा त्यांनी एका मागोमाग एक धक्कादायक माहिती उघड केली. वकील अमित प्रसाद यांनी सांगितलं की, हत्याकांडातील प्रमुख आरोपी आफताब एक प्रोफेशनल शेफ होता. त्यामुळे त्याला बॉडी पार्ट ठेवण्याची पूर्णपणे माहिती त्याला होती.  त्याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत श्रद्धाचा गळा दाबून जीव घेतला आणि शरीराचे तुकडे तुकडे करून डीप फ्रीजरमध्ये ठेवले.

सरकारी वकिलांनी कोर्टात पुढे सांगितलं की, आफताब एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ होता. त्यामुळे चाकू वापरणं त्याला चांगल्या प्रकारे माहिती होतं.तसेच मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता असते, याची त्याला पूर्णपणे माहिती होती. यासाठी आफताबने सुका बर्फ आणि अगरबत्ती मागवली होती.

“श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने दुसरी गर्लफ्रेंड पटवली आणि तिला श्रद्धाची अंगठी घातली होती.” असंही सरकारी वकिलांना कोर्टात सांगितलं. वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश मनीषा कक्कड यांनी पुढील सुनावणी 20 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांड नेमकं काय आहे ?

मुंबईत राहणारी श्रद्धा वालकर आफताब आमीन पूनावालासोबत लिव्ह इन पार्टनरमध्ये दिल्लीत राहात होती. या दरम्यान ती कुटुंबियांशी संपर्कात नव्हती. कुटुंबासोबत तिचं कोणतंच बोलणं या दरम्यान झालं नाही. असं असताना आफताब सोबत तिचं भांडण झालं. तेव्हा त्याने तिला मे 2022 मध्ये गळा दाबून जीवे मारलं. त्यानंतर श्रद्धाचे 35 तुकडे केले आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवले. मग अर्ध्या रात्री 2 वाजता तुकडे महरौली जंगलात फेकायचा.

दिल्ली पोलिसांनी आफताबला 12 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली होती. 24 जानेवारी 2023 रोजी आफताबविरोधात 6,629 पानी चार्जशीट दाखल केली होती. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को आणि पॉलीग्राफ टेस्टही केली होती. त्यात त्याने हत्या केल्याची कबुली दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी 150 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.