चंद्रपूर : पोंभुर्णा तहसिल अंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. एका 15 वर्षाच्या मुलीच्या अचानक पोटात दुखू लागले. तिची आई तिला डॉक्टरांकडे तपासायला घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जे सांगितले त्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच आईने थेट पोलीस ठाणे गाठत अत्याचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 19 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
नववीत शिकणाऱ्या मुलीचे गावातील 19 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध सुरु होते. दोघांमध्ये शरीरसंबंधही होत होते. यातूनच अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या अचानक पोटाच दुखू लागल्याने आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. लोकेश चुदरी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मुलीसोबतच्या प्रेमसंबंधाची कबुली दिली.
अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमातून गर्भधारणा होत घरातच प्रसुती केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली. नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेतला जात आहे.
नवव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून एका तरुणाशी सुत जुळलं होतं. यानंतर तरुणाने त्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. यातून तिला गर्भधारणा झाली. घरात कोणाला कळू नये म्हणून त्या अल्पवयीन मुलींने स्वतःच घरात प्रसुती करत बाळाला जन्म दिला. मात्र संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर प्रकृती खराब असल्यानं तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित मुलीने आईला घटनाक्रम सांगितला.