1 कोटी 15 लाखाचे सोनं, 56 लाखाची कॅश… सगळा माल हातात होता, पण शेवटी फसलाच

| Updated on: Oct 03, 2022 | 8:20 PM

चालत्या गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने आरपीएफला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. मात्र चौकशीत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

1 कोटी 15 लाखाचे सोनं, 56 लाखाची कॅश... सगळा माल हातात होता, पण शेवटी फसलाच
टिटवाळा रेल्वे स्थानकात सोने आणि रोकडसह आरोपी अटक
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : टिटवाळा स्टेशनवर रात्रीच्या सुमारास पु्ष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express) प्लॅटफॉर्मला लागली. गाडीचा वेग कमी होताच एक व्यक्ती घाईघाईने बॅग घेऊन चालत्या गाडीतून खाली उतरला. हा व्यक्ती रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नातच होता की, टिटवाळा रेल्वे स्थानकात (Titwala Railway Station) ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवले. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याच्या बॅगेची झडती घेतली. बॅग उघडताच समोर जे दृश्य दिसले ते पाहून कल्याण रेल्वे पोलिसही (Kalyan Railway Police) चक्रावून गेले.

चालत्या गाडीतून गडबडीत टिटवाळा स्थानकात उतरला

सदर व्यक्ती 1 ऑक्टोबर रोजी रात्री टिटवाळा स्थानकात उतरला. चालत्या गाडीतून घाईगडबडीत उतरल्याने आरपीएफला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. मात्र चौकशीत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

सोन्याचा व्यापारी असल्याचे पोलिसांना सांगितले

पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने आपले नाव जीपी मोंडल असून आपण नवी मुंबईतील रहिवासी आहे, तसेच तो सोन्याचा व्यापार करतो आणि लखनौ येथून आला आहे, अशी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला बॅगेत काय आहे, असे विचारले असता तो गडबडला.

हे सुद्धा वाचा

बॅगेत आढळले पावणे कोटीचे घबाड

पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बॅग उघडून दाखवली. यावेळी बॅगेत तब्बल 1 कोटी 15 लाखांचे सोने आणि सुमारे 56 लाखांची रोकड आढळून आली. बॅगेतील घबाड पाहून रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.

आयकर विभागाकडून मुद्देमाल जप्त

पोलिसांनी त्याच्याकडे कादगपत्रे मागितली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. रेल्वे पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिली. सदर सोने आणि रोख रक्कम टिटवाळा परिसरातील कोणत्या सोनारांकडे देण्यात येणार होती याचा पोलीस तपास करत आहेत.

आयकर विभागाच्या टीमने 500 रुपयांच्या 11 हजार 200 नोटा असा एकूण 56 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 15 लाख 16 हजार किंमतीचे सोने असा एकूण 1 कोटी 71 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.