आरोपींना आणताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात.असाच एक २५ हजार रुपयांचे इनाम नावावर असलेला आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून निसटला आहे. या आरोपीला ट्रेनमधून आणत असताना त्याने टॉयलेट जातो असे पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर तो चालत्या ट्रेनमधून पसार झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बहुजन समाजवादी पार्टीचे नेते कमालुद्दीन यांच्या हत्येप्रकरणातल्या आरोपीला उत्तर प्रदेशातील आझमगडची पोलिस गुजरातहून आणत असताना ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. या आरोपीवर २५ हजाराचे इनाम होते. त्याला गुजरात हून आणले जात होते. त्यावेळी त्याने टॉयलेटला जातो असे पोलिसांना सांगितले आणि तो परत आलाच नाही.आझमगडचे एसपीने या आरोपीला पकडण्यासाठी पथके पाठविली असून लवकरच आरोपी ताब्यात येईल असे म्हटले आहे.
साल २०२१ मध्ये आझमगड येथे बसपा नेते कलामुद्दीन यांची हत्या झाली होती. या हत्याकांडात आरोपी मुस्तफिज हसन ऊर्फ बाबू फरार होता. त्यानंतर पोलिसांना खबर लागली की तो गुजरात येथे आहे. त्यानंतर स्थानिय पोलिसांचे एक टीम गुजरातला पाठविण्यात आले. ही टीम आरोपीला ट्रेनमधून युपीला आणत होती. तेव्हा मधल्या मध्येच पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झाला आहे.
मुस्तफिज हसन ऊर्फ बाबू यांच्या पसार होण्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. जेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी ही बातमी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली तेव्हा जिल्ह्यात खळबळ उडाली. सध्या त्याच्या शोघासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एसी शैलेंद्र लाल यांनी सांगितले की पोलीस कस्टडीतून पळालेल्या आरोपीला लवकर पकडले जाईल आणि हलगर्जीपणा बद्दल कठोर कारवाई केली जाईल.
खूनाच्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या इन्सपेक्टर आणि त्यांच्या टीमची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड पोलिसांनी गुजरातच्या अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीच्या अटकेसाठी टीम स्थापन केल्या आहेत.