नागपूर / सुनील ढगे : मित्राच्या मदतीने दुचाकी चोरायचा आणि मग त्या दुचाकीचा वापर करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला पकडण्यात हुडकेश्वर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. आकाश साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चैन स्नॅचिंगच्या घटनांचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत.
हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी एकाच पद्धतीने दोन चैन स्नाचिंगच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी वेगवेगळे सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोराचा शोध घेत मुसक्या आवळल्या.
चोरट्याने आतापर्यंत अनेक चैन स्नाचिंगचे गुन्हे केले असून, त्याच्यावर बॉडी ओफेन्सचे गुन्हे देखील दाखल आहेत. तो मोटर सायकल चोरण्यासाठी मित्राची मदत घ्यायचा, मात्र चैन स्नॅचिंग तो एकटा करायचा. हा कुठलेही काम धंदा करत नाही तर चैन स्नॅचिंग करून पैसे कमवतो आणि त्या पैशावर जगतो. पोलीस तपासात आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मलकापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महागड्या बॅटरी आणि इतर लोखंडी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यावरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.