ठाणे : अल्पवयीन (Kidnapping of girls) मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच प्रकार (Thane Police) महात्मा फुले पोलीस ठाणे परिसरात होत असताना पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मतिमंद मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनर्थ टळला आहे. आरोपीच्या (Mobile) मोबाईलच्या पांढऱ्या कलरमुळे त्याचा हा काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल दोन वर्षांनी घडलेल्या घटनेतून आरोपी कल्याण महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात आहे. सचिन सूर्यवंशी असे आरोपीचे नाव असून पुढील तपास महात्मा फुले पोलीस करीत आहेत. तपासकार्यात सातत्य ठेवल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यामुळे पोलीस ठाणे हद्दीतील अशा घटनांना आता पूर्णविराम मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत एक अकरा वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलगी खेळत असताना तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न दोन वर्षापूर्वी झाला होता. मात्र, आजूबाजूच्या नागरिकांमुळे आरोपीचा हा प्रयत्न फसला होता. त्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती. त्यामुळे या भागातील सीसीटीव्ही फुटेजमाध्यमातून आरोपीचा शोध सुरु होता. मात्र दोन वर्ष होऊन आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. असे असतानाही तीन वेगवेगळ्या टीम करून तपास सुरू ठेवला होता. दोन वर्षाने पोलीसांना सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीने अन्य ठिकाणी ही अशाच प्रकारे कृत्य केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महात्मा फुले पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. त्यानुसार दोन्ही सीसीटीव्हीमध्ये पांढऱ्या रंगाचा मोबाईल असल्याचे निदर्शनास आल्याने पहिल्या घटनेतील आणि आताच्या घटनेतील आरोपी एकच असल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्हीमधून तांत्रिक माहितीच्या अनुषंगाने व गुप्त माहितीच्या आधारे कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचून सीसीटीव्ही दिसणाऱ्या आरोपी ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच मुलीवर अत्याचार करण्यासाठी मुलीचे अपहरण केल्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून आपला अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी कल्याण परिसरात राहणारा असून मुंबईमध्ये सिक्युरिटी गार्ड चे काम करत आहे त्याने अश्या प्रकारे अनेक गुन्हे केले असून याच्या वर कोणत्याही पोलीस स्थानकात कुठेही दाखल नाही. परिमंडळ तीन चे DCP सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने – पाटील व महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली महात्मा फुलेचे प्रदिप पाटील,देविदास ढोले, दिपक सरोदे यांनी प्रयत्न केले.