सलमान खानला धमकी देणारा अटकेत, आरोपीला न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: Mar 27, 2023 | 5:50 PM

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमानच्या ऑफिसमध्ये ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत होते.

सलमान खानला धमकी देणारा अटकेत, आरोपीला न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी
सलमान खानला धमकी देणारा अटक
Follow us on

मुंबई / गोविंद ठाकूर : चित्रपट अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधील जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. सलमान खानच्या ऑफिसच्या ईमेलवर मेल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत बांद्रा पोलिसात 26 मार्च रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती. एफआयआर नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान ईमेलवरून धमकी देणारा आरोपी राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे पथक जोधपूरला गेले आणि आरोपीला अटक करून मुंबईत आणले. धाकडराम रामलाल सियाग असे अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप आणि त्यांच्या पथकाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपील अटक केली. या आरोपीचा विश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना अद्याप सापडलेले नाही. मात्र पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. याआधीही आरोपीविरुद्ध पंजाबच्या पोलीस ठाण्यात धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमान खानला पुन्हा धमकी आल्यानंतर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. केवळ सलमान खानच नाही तर त्याच्या कुटुंबालाही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सलमान खानच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे पथक 24 तास त्याच्या घराबाहेर तैनात असते.

हे सुद्धा वाचा