आठवडी बाजार आणण्यासाठी चालले होते, अचानक दोघे जण जवळ आले अन् अॅसिड फेकून गेले !

| Updated on: Jul 10, 2023 | 5:18 PM

स्कूटीवरुन बाजारात चाललेल्या व्यावसायिकाला अज्ञात आरोपींनी रस्त्यात गाठले. मग त्यांच्यावर हल्ला करुन पसार झाले. या घनटेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आठवडी बाजार आणण्यासाठी चालले होते, अचानक दोघे जण जवळ आले अन् अॅसिड फेकून गेले !
विरारमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

विरार : अज्ञात कारणातून एका व्यावसायिकावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या हल्ल्यात व्यावसायिक जखमी झाला आहे. जखमी व्यावसायिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोबिन आसमत शेख असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्स जवळ रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भादवी कलम 326 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी विरार गुन्हे प्रकटीकरणचे पथक रवाना झाले आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या हल्ल्याचे कारण समोर येईल.

बाजारात जात असताना हल्ला

मोबिन शेख यांचा एलईडी लाईटच्या सर्व्हिलिंगचा व्यवसाय आहे. सोमवारी शेख हे आठवडी बाजार आणण्यासाठी आपल्या स्कूटीवरुन चालले होते. यावेळी मकवाना कॉम्प्लेक्सजवळ दोन तरुण मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांनी पिशवीतून अॅसिड बाहेर काढले आणि शेख यांच्यावर फेकून फरार झाले. यात शेख यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

आरोपींनी हा हल्ला कोणत्या उद्देशाने केला? पीडित आणि आरोपींमध्ये काही जुना वाद होता का? याबाबत अद्याप काहीच माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी घटनासथ्ळी धाव घेत पीडिताला रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाची पाहणी करत आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार केले आहे.

हे सुद्धा वाचा

दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.