जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Nov 14, 2022 | 8:35 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाडीजवळून बाहेर पडत असतांना भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक
Image Credit source: TV9 Network
Follow us on

ठाणे : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासाच्या आत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने ही तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही तासांमधील हा दूसरा गुन्हा आहे. पहिल गुन्हा हा हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्याच्या मुद्द्यावरून दाखल झाला होता, त्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती, मात्र, न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला होता. हे प्रकरण होऊन काही तास होत नाही तोच दूसरा गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गाडीजवळून बाहेर पडत असतांना भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावरून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वतः महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला असून याबाबत आव्हाड यांनीही ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ही लोकशाहीची हत्या असून मी राजीनामा देणार असल्याचे जाहीर देखील केले असून आव्हाड यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर होणारी कारवाई योग्य नसल्याने आव्हाड यांचे कार्यकर्ते यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून कारवाईचा निषेध व्यक्त करत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील होणारी कारवाई बघता राष्ट्रवादीचे आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून राजकीय वातावरण तापू लागलं असून कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.