मुंबई : टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांनी अभिनेता अरमान जैन याला आज (Arman Jain Absent For ED Inquiry) चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होत. मात्र,अरमान चौकशीसाठी हजर झाला नाही. अरमान हा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांचा नातू आहे. अरमान हा टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरणातील एक आरोपी विहंग नाईक यांच्या संपर्कात होता. व्यवहाराबाबतचे काही आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप चॅट सापडल्याने अरमान याची ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करायची आहे (Arman Jain Absent For ED Inquiry).
काय आहे टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरण?
काही दिवसांपूर्वी टॉप्स सिक्युरिटी घोटाळा उघडकीस आला आहे. एमएमआरडीएला ट्राफिक वॉर्डन पुरवण्याबाबतचा हा घोटाळा आहे. एमएमआरडीएला पाचशे ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचं कंत्राट टॉप्स सिक्युरिटीला मिळाल होतं. टॉप्स सfक्युरिटी मात्र, 75 टक्के ट्राफिक वॉर्डन पुरवत होती आणि बाकी वॉर्डन यांची नेमणूक न करताच पैसे लाटत होती.
या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपास ईडीने सुरु केला आहे. या गुन्ह्यात टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहून नंदा आदी 11 जण आरोपी आहेत. यापैकी काही जणांना अटक झाली आहे.
याच गुन्ह्यात शिवसेनेचे आमदार, नेते प्रताप सरनाईक यांची अनेकदा चौकशी झाली आहे. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी झाली आहे. विहंग याच्या चौकशीत अरमान जैन याचा ही या प्रकरणात सहभाग असावा, असा ईडीच्या अधिकाऱ्यांना सवश्य आहे. विहंग आणि अरमान जैन हे जवळचे मित्र आहेत. विहंग याच्या व्हाट्सअॅप चॅटचा तपास करत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांना विहंग आणि अरमान यांच्यात टॉप्स सिक्युरिटीच्या व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याशी अरमान याचा काय संबंध आहे, याचा ईडीचे अधिकारी शोध घेत आहेत (Arman Jain Absent For ED Inquiry).
काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरमान याच्या दक्षिण मुंबईतील घरी धाड टाकून काही कागदपत्र शोधली आहेत. यावेळी काही महत्वाचे कागदपत्र ईडी अधिकाऱ्याच्या हाती लागली आहेत. याच कागदपत्राबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना अरमान याची चौकशी करायची आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी अरमान याला समन्स बजावण्यात आला होता. यावेळी अरमानला आज 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चौकशी कामी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, अरमान आलाच नाही.
अरमान जैन हा बॉलिवूडमधील प्रसिध्द निर्माता, दिग्दर्शक राज कपूर यांची मुलगी रीमा जैन यांचा मुलगा आहे.
इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड https://t.co/0Okc3dGDgk #ArmanJain | #ED | #RajivKapoor
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
Arman Jain Absent For ED Inquiry
संबंधित बातम्या :
टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच?